सांगलीत वीज कोसळून एकजण ठार तर दोनजण जखमी

कर्नाटक सीमेवर असलेल्या चाबूकस्वारवाडी गावात मंगळवारी सायंकाळी वीज (accident) पडून एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. जोरदार वारे आणि वीजेचा कडकडाट यापासून बचाव करण्यासाठी पडयया घराजवळ असलेल्या शौचालयाच्या आडोशाला उभा राहिलेल्या मजूरांच्या अंगावर वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

चाबूकस्वारवाडी आणि कर्नाटकातील शिरूर गावच्या शिवेवर विहीर खुदाईचे काम सुरू आहे. दुपारी जोरदार वारे वाहू लागल्याने आणि वीजेचा कडकडाट सुरू झाल्याने विहीर खुदाईचे काम करणारे सुभांष नाईक (वय ३३ रा. खटाव, ता. मिरज) आणि सहदेव धोतरे व संदीप पवार (दोघेही वय २२ रा. बीड) हे पड क्या घराच्या शौचालयाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक वीज(accident) कोसळल्याने नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृर्ती गंभीर असल्याने रात्री उशिरा मिरजेतील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा :

मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी; अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर सडकून टीका

अमित शाहांचे गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?