वाचनातून संवादाची मोकळी वाट

संवादिनी ग्रुप सहा वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थापन (starting up)झाला. ‘संवाद बालक पालक’ या माध्यमातून हा ग्रुप सुरू केला होता.


संवादिनी ग्रुप सहा वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थापन(starting up) झाला. ‘संवाद बालक पालक’ या माध्यमातून हा ग्रुप सुरू केला होता. हा ग्रुप सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की, लहान मुलांना पुस्तक वाचण्याची सवय लागावी किंवा त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी ‘संवाद बालक पालक’च्या वतीनं संवाद कट्टे सुरू केले होते. त्यादरम्यान जवळजवळ १६ ते १७ वाचन कट्टे सुरू केले होते.
संवाद कट्टे सुरू करण्याची संकल्पना आमचीच होती; पण यासाठी पुढाकार मात्र पालकांनी घेतला होता. त्यावेळी या उपक्रमाला पाहिजे असा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावर काय उपाय करावा म्हणून आम्ही थोडा अभ्यास सुरू केला. त्यावेळी आमच्या लक्षात आलं, की घरामध्ये आयांच्याच (पालकांच्या) हातात पुस्तक नाही, त्यामुळे मुलांचा यासाठी प्रतिसाद मिळत नाही.

त्यावेळी आम्ही विचार केला, की आपण महिला-पालकांसाठी काहीतरी सुरू करायला हवं. मग ‘बालक पालक ग्रुप’मधल्या काही महिला होत्या ज्यांनी वाचन कट्टे सुरू केले होते, त्या सर्वांना आम्ही आवाहन केलं, की आपण संवादिनी नावाचा ग्रुप सुरू करतोय, त्यामध्ये आपण स्त्री वाचनावर भर देणार आहोत.
त्यामध्ये असं ठरलं, की दर महिन्याला प्रत्येक स्त्रीनं एक पुस्तक वाचायचं अन् महिन्याच्या कोणत्याही एका तारखेला आपण सर्वांनी एकत्र भेटायचं आणि त्यावर एकत्र भेटून चर्चा करायची. यातून झालं असं की, या स्त्रिया घरात हातात पुस्तक घेऊन बसू लागल्यामुळे आपोआपच त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक येऊ लागले. त्यांना वाचनाची आवड निर्माण होऊ लागली.

सध्या या ग्रुपमध्ये दीडशे पेक्षा जास्त महिला आहेत. दर महिन्याच्या पंधरा तारखेला आम्ही सर्वजणी एकत्रित भेटतो. आम्ही महिनाभर वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करतो आणि एखाद्या ज्वलंत विषय निवडून त्यावर चर्चाही करतो. या ग्रुपमधील सर्व कामं आम्ही विभागून घेतो आणि त्यावर काम करतो. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पुस्तक वाचल्यानंतर आम्ही अभिप्राय टाकत असतो.

महिन्याभरातल्या सर्व मीटिंग, फॉलोअपची कामं सर्व जणी विभागून करतात. या ग्रुपमध्ये २८ ते ८७ वर्षापर्यंतच्या महिला सहभागी आहेत. हा ग्रुप सांगली, इस्लामपूर, बेलापूर (मुंबई) अशा ठिकाणी सध्या सुरू आहे. इचलकरंजीमध्ये थोड्याच दिवसांत ग्रुप सुरू होईल. या ग्रुपमध्ये महिला वाचायलाच नाही, तर त्यामुळे आता बोलायलाही शिकल्या, व्यक्त होऊ लागल्या, तणावातून बाहेर येऊ लागल्या.

आम्ही फक्त वाचनच नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरदेखील काम करत आहोत. त्या वाचत नसतील तर का वाचत नाहीयेत? घरात काही अडचणी आहेत का? असे वेळीच प्रश्‍न विचारून त्याचा पाठपुरावा घेत असतो. मग त्या हळूहळू रूळायला लागतात. वाचनामुळे त्यांना तणावातून बाहेर यायला खूप मदत झाली.

हेही वाचा :

सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे संजय मंडलिकांचा हल्लाबोल

कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान

13 एप्रिलपासून या 3 राशींना येणार अच्छे दिन होणार आर्थिक भरभराट