कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणात दोन निष्पाप इंजिनीअर तरुण(youth)-तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील मस्तवाल बिल्डर विशाल अगरवाल याला आज पुणे पोलीस न्यायालयात घेऊन येत होते. यावेळी संतापाचा उद्रेक झाला आणि वंदे मातरम् संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शाई फेकली.
कल्याणीनगर परिसरात बेदरकारपणे अलिशान मोटार चालवून मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात बाल न्याय मंडळाने अल्पवयीनाला जामीन मंजूर केला. मुलाचे वडील विशाल अगरवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले. बुधवारी दुपारच्या सुमारास अगरवालला न्यायालयात आणण्यात येत होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांची गाडी त्याला घेउन येत असल्याचे पाहताच वंदे मातरम संघटनेच्या 6 ते 8 कार्यकर्त्यांनी व्हॅनकडे धाव घेत शाई फेकली. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी संघटनेच्या कार्य़कर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. अल्पवयीन जेवढा जबाबदार आहे, त्याचे वडीलही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.(youth)
अल्पवयीन आरोपी ज्या बारमध्ये दारु पिण्यासाठी बसला होता, त्याच्यासोबत अनेक मित्र दारु पित होते. त्या सर्वांना या प्रकरणात आरोपी करा, अशी मागणी वंदे मातरम संघटनेने केली आहे. याप्रकरणी आरोपीचे तोंड काळे करण्यासाठी आम्ही आंदोलन केल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले. आम्ही काही प्रमाणात त्याच्यावर शाई फेकण्यात यशस्वी झालो आहोत. असेही पदाधिकाऱयांनी सांगितले.
अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द; 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी
बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांना चिरडणाऱया अल्पवयीन आरोपीचा जामीन अखेर जुवेनाईल कोर्टाने रद्द केला. त्याची रवानगी 14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. भयंकर अपघातानंतर अवघ्या 15 तासांत आरोपीला जामीन मिळाल्यामुळे पुणे पोलीस आणि कोर्टावर टीका झाली होती. त्यानंतर आज आरोपीचा जामीन रद्द केला.
हेही वाचा :
अमित शाहांचे गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?
माढ्यात तुतारीच शेतकरी 11 बुलेटची पैज लावायला तयार, भाजपाकडून चॅलेंज कोण स्वीकारणार?