पंकजा म्हणाल्या, प्रीतमला नाशिकमधून उभी करेन!

पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी (decision)अर्ज दाखल करण्याची वेळ आली तरी लोकसभेच्या जागांवरून महायुतीत खेचाखेची सुरूच आहे. नाशिकची जागा कोण लढणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना येथून निवडणुकीत उभे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तुम्ही बीड लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला पंकजा यांना दिला आहे.

भाजपकडून बीड लोकसभेचे दोन (decision)वेळा प्रतिनिधित्व करणाऱया प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांची बहीण पंकजा यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर प्रीतम यांचे काय होणार, अशी चर्चा मुंडे समर्थक व राजकीय वर्तुळात आहे.

पार्श्वभूमीवर पंकजा यांनी प्रीतम यांना नाशिकमधून उभी करेन, असे वक्तव्य एका जाहीर कार्यक्रमात केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

मिसळ उत्सव आजपासून! ‘सकाळ’तर्फे खवय्यांसाठी खास संधी

रिकर्वमध्ये हिंदुस्थानी संघ अंतिम फेरीत

दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, राज्यातील ‘या’ ८ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष