मिसळचे विविध प्रकार खवय्ये पुणेकरांना एकाच छताखाली(roof) उपलब्ध होणार आहेत.
पुणे – मिसळचे विविध प्रकार खवय्ये पुणेकरांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीच्या ‘सकाळ माध्यम समूहाने’ आयोजित केलेल्या मिसळ उत्सवाला शुक्रवारी (ता. २६) प्रारंभ होत आहे. हा महोत्सव रविवारपर्यंत (ता. २८) आहे.
मिसळ उत्सवाला शुक्रवारी (ता. २६) प्रारंभ होत आहे. रविवारपर्यंत (roof) हा तीन दिवसांचा ‘मिसळ उत्सव’ खाद्यप्रेमींसाठी रंगणार आहे. ‘मिसळ उत्सवा’चे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनातील असिस्टंट कमिशनर प्रवीण उमाप यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता होईल.
कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नाद खुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ या आणि त्याहून अधिक प्रकारच्या मिसळ या उत्सवात असतील. मिसळ पाव, कडधान्याची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे.
तसेच मिसळ हा महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे भुकेच्या वेळी अस्सल खवय्यांना मिसळ आठवतेच. त्याशिवाय मित्रमंडळींना एकत्र जमविण्यासाठीही मिसळ हेच निमित्त असते.
या सर्व बाबी लक्षात घेऊन हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. राज मसाले आणि अक्कुदास ट्रेडिंग हे या उत्सवाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. तर केळकर हाउसिंग हे रिअल इस्टेट आणि ऑटो पार्टनर ‘नमः शिवाय हीरो’ हे आहेत.
हेही वाचा :
दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, राज्यातील ‘या’ ८ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष
उम्मीद पर ‘आरसीबी’ कायम है! सहा पराभवानंतर चाखली विजयाची चव
विद्यार्थ्या उत्तरपत्रिकेत लिहिलं जय श्री रामशिक्षकाने केलं पास विद्यापिठाकडून कारवाई