जनतेनेच धडा शिकवावा! ; पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारवर शरद पवार यांची टीका

गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकार(govt) कोणतीही आश्वासने पूर्ण न करता विरोधकांनाच तुम्ही काय केले, असे विचारते.


जामनेर (जि. जळगाव) : गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकार कोणतीही आश्वासने पूर्ण न करता विरोधकांनाच तुम्ही काय केले, असे विचारते. स्वातंत्र्य मिळवून देणारे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात. अशा हुकूमशाही प्रवृत्तीला या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथील मेळाव्यात केले(govt).

रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ गांधी चौकातील भागीरथीबाई वाचनालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. जळगाव येथून नागपूरला निघालेल्या शेतकरी दिंडीची आठवण पवार यांनी या वेळी काढली. आम्ही शेतकऱ्यांसाठी स्वाभिमान योजना आणली पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना ६५ हजार कोटींची कर्जमाफी दिली, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो यात्रेचेही पवार यांनी कौतुक केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी टीका केली म्हणून त्यांना कारागृहात टाकले. जनता ही हुकूमशाही राजवट मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली. देशात आज महागाई, बेरोजगारी वाढली आहे. उज्ज्वला सिलिंडर योजनेबाबत महिलांची फसवणूक केली. घरगुती सिलिंडरचे दरही वाढले आहेत. मोदी राज्यकारभार करण्यात अपयशी ठरले आहेत.

हेही वाचा :

अरेच्चा! एका दिवसात २४ तास नसतात.., पृथ्वी विषयी

संख्याबळाची दावेदारी:400 खासदारांची काँग्रेस 300 जागा लढवू शकत नाही : मोदी

निवडणूक ड्युटी टाळणाऱ्यांवर आयोगाचे कारवाईचे संकेत