निवडणूक ड्युटी टाळणाऱ्यांवर आयोगाचे कारवाईचे संकेत

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. यात निवडणूक कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण(training) सुरू आहे.


अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. यात निवडणूक कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण(training) सुरू आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना हे काम किचकट, कटकटीचे वाटते त्यामुळेच जिल्ह्यातील ३२३ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्मचारी म्हणून काम करण्यास नकार दिला आहे.

निवडणूक कर्मचारी म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे दाखवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी बनावट लग्न पत्रिकेसारखी कागदपत्रे जोडल्याने त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी शासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

हेही वाचा :

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?.

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल