मुंबईसाठी प्लेऑफचं गणित किचकट, पाहा कशीये पाईंट्स टेबलची स्थिती?

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव (MI vs CSK) केल्याने पलटणसाठी आता प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे. पाहा मुंबई इंडियन्स पाँईंट्स टेबलमध्ये (IPL) कितव्या स्थानावर?

कॅप्टन ऋतुराज गायकवाडची (IPL) तडाकेबाज खेळी अन् अखेरीस महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी धूळ चारली. रोहित शर्माचं (Rohit Sharma) शतक देखील मुंबईला विजय मिळवून देऊ शकलं नाही. पाथिरानाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने रोहितचे जोडीदार फोडले अन् मुंबईची एक बाजू कमकुवत केली. अखेरच्या 4 ओव्हरमध्ये मुंबईला 72 धावांची गरज होती. पण मुंबईला 208 धावांचा किल्ला भेदता आला नाही. मुंबईचा डाव 186 धावांवार आटोपला. त्यामुळे पारंपारिक लढाईत पुन्हा एकदा चेन्नईने मुंबईवर (MI vs CSK) विजय मिळवला आहे. मुंबईला आता यंदाच्या हंगामात चौथा पराभव (IPL Points Table Scenario) झाल्याने आता प्लेऑफसाठी मुंबईला आणखी जोर लावाला लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ 6 सामन्यात 5 विजय मिळवून पाईंट्स टेबलवर राज्य करत आहे. त्यांच्याकडे 10 अंक जमा झाले आहेत. 0.767 चा नेट रननेट असल्याने राजस्थान मजबूत स्थितीत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स 1.528 चा नेट रननेट अन् 6 गुणासह दुसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर चेन्नई देखील 8 अंकासह 0.728 च्या नेट रननेटने तिसऱ्या स्थानावर आहे. तर लखनऊचा संघ 6 अंक अन् 0.436 च्या नेट रननेटमुळे चौथ्या स्थानी आहे. तर हैदराबाद आणि गुजरात 6-6 अंकासह अनुक्रममे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर स्थिरावलेत.

पाईंट्स टेबलच्या खालच्या बाजूला नजर टाकली तर, पंजाब किंग्ज 4 अंक आणि -0.208 नेट रननेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यानंतर 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे. मात्र, पंजाबचा नेट रननेट घसरलाय. तर दिल्ली 9 व्या स्थानी -0.975 अंकासह आहे. आरसीबीला अद्याप एकच विजय मिळता आलाय. गेल्या चार सामन्यातील पराभवामुळे आरसीबी पाईंट्स टेबलच्या अखेरच्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 6 सामन्यात 2 विजय मिळवले आहेत, तर दोन सामने गमवावे लागले. आता मुंबई इंडियन्सला आणखी 8 सामने खेळायचे आहेत. त्यात राजस्थान रॉयल्ससोबत एक आणि कोलकाता विरुद्ध 2 सामने असतील. त्यामुळे तीन सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवणं थोडं अवघड दिसतंय. त्यामुळे उर्वरित, पंबाजविरुद्ध सामना, दिल्ली आणि लखनऊविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबईला विजय मिळवला लागेल. त्याचबरोबर मुंबईचा एक सामना तगड्या हैदराबादसोबत होणार असल्याने आता मुंबईला आणखी ताकद लावावी लागणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 8 सामन्यांपैकी कमीत कमी 5 ते 6 सामन्यात विजय मिळवावाच लागेल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.

हेही वाचा :

32 ते 65 इंचांपर्यंतच्या टीव्हीवर मिळत आहे मोठी सूट

मोठा ट्विस्ट… सांगलीत बंड होणार?, प्रकाश आंबेडकर कुणाला देणार पाठिंबा?

कतरिना कैफ हिला कसं पटवलंस? विकी कौशल याने दिलं सडेतोड उत्तर