PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकमधील आयोजित सभेत विरोधकांवर(pm) टीका केली. ‘काही लोक संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार करत आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना देशात ‘पुतीन’ मॉडेल आणायचं आहे. विरोधकांना तुरुंगात डांबायचं. धमक्या द्यायच्या. हाच देशाला मोठा धोका आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी(pm) संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘ पंतप्रधान मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा खाली आणली. ती देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राजकारणात लोक खोट बोलतात. पण त्यांनी इतकं खोट बोलू नये. त्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजे.

लोकशाहीत विरोधकांना महत्व असतं. त्यांना निवडणुका विरोधकांशिवाय घ्यायच्या आहेत. मोदींना देशात ‘पुतीन’ मॉडेल आणायचं आहे. मोदींच्या विचारसणीचा देशाला धोका आहे. विरोधकांना बदनाम करायचं , विरोधकांना तुरुंगात टाकायचं. धमक्या द्यायच्या. धमक्या देऊन पक्षात घ्यायचे. हाच देशाला मोठा धोका आहे’.

PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

सांगलीच्या जागेविषयी बोलताना राऊत म्हणाले, विश्वजित पाटील आणि विशाल पाटील यांच्या भावना समजू शकतो. सांगलीत जातीयवादी शक्तींची ताकद वाढली आहे. ही बाब त्यांना माहीत आहे. गेल्या दहा वर्षात भाजपचे खासदार निवडून येत आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचा उमेदवार पाहिजे, ही लोकांची मागणी आहे. तेथील काँग्रेस नेत्यांचा आदर आहे. डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्यामागे आम्ही उभे आहोत. काँग्रेसनेही जागा सोडली आहे. त्यांच्या भावनांचा आदर करू’.

वर्षा गायकवाड यांच्या नाराजीवर राऊत म्हणाले, ‘आम्ही सर्व जागा एकत्र लढत आहोत. आम्हाला एकत्र काम करत आहोत. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. वर्षा गायकवाड यांची समजूत काढू’.

हेही वाचा :

मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये ‘हाच’ संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?

अमोल कोल्हेंचा भाजपला दे धक्का; ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश!

तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत