आताची मोठी बातमी,स्टेजवरच नितीन गडकरींना भोवळ

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार राजश्री पाटील (Rajashree Patil) यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भोवळ येऊन कोसळले. कार्यकर्त्यांनी त्यांना सावरत मंचावरून उचलून नेलें आणि ताबडतोब त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. (health issue)