मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह आणि देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या समाज माध्यमांवरून महाराजांना अभिवादन केलं आहे. मात्र काँग्रेस(political issue) नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या एक्स अकाउंटवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमुळे वाद होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. याच ट्विटवरून भाजप नेते आणि आमदार(political issue) अतुल भातखळकर आक्रमक झाले असून त्यांनी ही पोस्ट मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं असा इशाराही गांधींना भातखळकरांनी दिला आहे.
जयंतीच्या दिवशी आदरांजली अर्पण करतात. राहुल गांधी नेहमीच देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील महापुरूषांच्याविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. हा त्यातलाच गंभीर प्रकार आहे हे ट्विट मागे घ्यावं आणि आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देत अतुल भातखळकरांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही एक्स अकांउंटवरून राहुल गांधी यांना जयंतीला अभिवादन करतात हे सांगत माफी मागण्याची मागणी केली केली आहे.

राहुल गांधी जयंतीला श्रद्धांजली अर्पण करत नाहीत, अभिवादन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही लिहिलेले शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. माफी मागा!!! आणि अभिवादन आणि श्रद्धांजली यातील फरक आणि अर्थ जाणून घ्या. प्रत्येक वेळी पोपटासारखे कॅसेट वाजवू नका, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने राहुल गांधींवर टीका केली आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राहुल भाजपवरतच निशाणा साधला आहे. शिवराय या आराध्यांच्या संबंधाने आम्ही संवेदनशील आहोत. मात्र राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोशारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते याची आधी उत्तर द्यावी, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
‘मोनालिसा भोसलेचा डेब्यू वगैरे काही होणार नाही, चित्रपटाच्या बहाण्याने तिचं…’ निर्मात्याच्या आरोपाने एकच खळबळ
90 टक्के लोकांच्या डोकेदुखीमागे ‘हे’ आहे कारण, ‘अशी’ घ्या काळजी
फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ