टेलिव्हिजन सिरीयल (serial) पाहण्याचा प्रेक्षकांचा कल सर्वाधिक आहे. कायमच मालिकांच्या टीआरपीमध्ये चुरस रंगलेली असते. नुकतेच सोशल मीडियावर मालिकेच्या टीआरपीची यादी जाहीर झालेली आहे. ‘मराठी टेलिबझ ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजवर टीआरपी चार्ट शेअर करण्यात आलेला आहे. ०४ मे ते १० मे दरम्यानचा हा टीआरपी चार्ट आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ सिरीयल आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली आहे. सध्या मालिकेमध्ये दोघांच्याही नात्यात काहीही आलबेल सुरू नसल्याचे दिसत आहे. या कथानकाने मालिकेत नवा ट्विस्ट आलेला आहे. मालिकेला टीआरपी यादीत ६.९ इतके पॉइंट्स मिळालेले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर तेजश्री आणि राजची ‘प्रेमाची गोष्ट’ आहे. सध्या ह्या मालिकेतही (serial) प्रेक्षकांना वेगवेगळे ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे.
मालिकेचे कथानक मुक्ता, सागर आणि सावनी यांच्यात भोवती फिरत असल्याचे दिसत आहे. ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेने टीआरपी यादीत ६.६ इतके पॉइंट्स मिळवले आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आलेली आहे. ह्या मालिकेनेही टीआरपी यादीत आपले स्थान कायम ठेवले आहे. मालिकेला ६.५ इतके पॉइंट्स मिळालेले आहेत.
चौथ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आहे, तर पाचव्या क्रमांकावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. १६ व्या क्रमांकावर झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका आहे. ह्या मालिकेलाही पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर ‘शिवा’ आणि ‘नवरी मिळे हिटलर’ या मालिकाही टीआरपी यादीमध्ये आलेल्या आहेत. जरीही मालिकेचे टीआरपी चार्टमधील पॉईंटर्स कमी असले तरी सुद्धा मालिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा :
दहावी-बारावीच्या निकाला बाबत मोठी अपडेट
ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का….
कोल्हापूर शेतकरी संघात चाललंय काय? संचालकांकडून मर्जीतल्या आधिकाऱ्यांची अर्जी