बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (RCB)षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर (RCB)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर उभा केला. हैदराबादने 287 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीने 262 धावा केल्या अन् हैदराबादने 25 धावांनी सामना खिशात घातला. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेडने (Head) खणखणीत शतक ठोकलं तर हेन्री क्लासेनने (Heinrich Klaasen) 67 धावांची वादळी खेळी केली. हैदराबादने एका इनिंगमधील 22 सर्वाधिक षटकार खेचले. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डुप्लेसिसने 62 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 35 बॉलमध्ये 83 रन्सची धुंवाधार खेळी केली.
आरसीबीला डोंगराएवढं आव्हान पार करायचं होतं. सलामीला विराट कोहली अन् फाफ डुप्लेसिस यांनी दमदार सुरूवात करून दिली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये आरसीबीने 60 चा टप्पा पार केला. विराट कोहली 42 धावा करून बाद झाला अन् दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेल्या. पुढच्या 45 धावांवर आरसीबीची अर्धी टीम तंबूत परतली होती. मात्र, कॅप्टन फाफने 62 धावांची आक्रमक आणि झुंजार खेळी केली. तर दुसरीकडे दिनेश कार्तिकने पहिल्या बॉलपासून तिसऱ्या घेरवर बॅटिंग सुरू केली. दिनेशने 35 बॉलमध्ये 83 धावा चोपल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही अन् आरसीबीला सामना गमवावा लागला.
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिलं होतं. सनरायजर्स हैदराबादकडून फलंदाज अभिषेक शर्माने 38, ट्रेव्हिस हेडने 102, हेन्री क्लासेनने 67, एडन मार्करमने 32, अब्दुल समदने 37 धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने 9 चौकार आणि 8 षटकारांची आतिषबाजी करून केवळ 39 बॉलमध्ये शतक पूर्ण केले. ट्रेव्हिस हेडचं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील चौथं सर्वात वेगवान वेगवान शतक ठरलं. तर हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठा स्कोर बनवला. फक्त 19 दिवसात हैदराबादने स्वत:चाच विक्रम मोडून काढला अन् आयपीएलमध्ये नवा विक्रम रचला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.
हेही वाचा :
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला
खरंच प्रभू श्रीरामचंद्र मुंबईत आले होते का?
राजकीय वाटचालीची प्रेरक यशोगाथा