मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(Mumbai) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १९६ धावाच करता आल्या. मुंबईने एका हंगामात सर्वाधिक सामन्यात पराभव मिळवण्याच्या आपल्याच रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. मुंबईला आयपीएल २०२४मध्ये १० पराभवाचा सामना करावा लागला आहे.

याआधी २०२२मध्येही मुंबईने १० पराभवांचा सामना केला(Mumbai) आहे.मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर राहिला. ते या हंगामात १४ सामने खेळले या दरम्यान केवळ त्यांना ४ सामन्यात विजय मिळवता आला. तर १० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने सुरूवातीला तीन सामन्यात सलग पराभव पाहिला. त्यांना गुजरात, हैदराबाद आणि राजस्थानने हरवले. त्यानंतर दिल्ली, लखनऊ आणि कोलकातानेही हरवले.

मुंबईला २००९मध्ये ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर २०१४ आणि २०१८मध्ये ८-८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२२च्या हंगामात मुंबईने १० सामने गमावले होते आणि आता २०२४मध्ये संघाने १० सामने गमावले आहेत.

मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला. तर ४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या मैदानांवर केवळ १ सामना जिंकला आणि ६मध्ये पराभव स्वीकारला.

हेही वाचा :

केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार का हसले ?

कोल्हापूर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

मिरजेत एकावर कोयत्याने वार; संशयित अल्पवयीन