रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? Video Viral

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ(match) लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील शेवटचा सामना असणार आहे. दरम्यान अशी चर्चा सुरु आहे की, हा रोहित शर्माचा हा या हंगामातील शेवटचा सामना असू शकतो. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला होता.

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने(match) मोठा निर्णय घेतला होता. हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधार पदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पंड्या विरुद्ध मुंबई इंडियन्स असे २ गट पडले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. कर्णधारपदावरुन काढल्यानंतर रोहित शर्माला फॅन्सकडून प्रचंड सपोर्ट मिळाला. तर हार्दिक पंड्याला तितकच ट्रोल केलं गेलं.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा देखील करण्यात आला आहे की, रोहित शर्मा आगामी हंगामात मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये जाऊ शकतो. या बातमीचं वजन तेव्हा वाढलं जेव्हा मुंबईचा संघ केकेआरविरुद्धचा सामना खेळण्यासाठी कोलकाताला गेला. त्यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

ज्यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणाबाबत बोलत होता. या व्हिडिओमध्ये तो, हे तर माझं शेवटचं आहे असं बोलताना दिसून येत आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, रोहितचं हे मुंबई इंडियन्स संघासाठी शेवटचं हंगाम असू शकतं आणि आज होणारा सामना हा रोहितचा मुंबई इंडियन्स संघासाठी शेवटचा सामना असू शकतो.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये असल्याचं दिसून आलं होतं. एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, मुंबई इंडियन्सनंतर तुला कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? त्यावेळी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नाव घेतलं होतं.

हेही वाचा :

आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण?

संजयकाकांच्या दिलदार मित्राने चंद्रहार पाटलांचा बळी दिला!

मुंबई ते नाशिक, एका बॅगेचा झालेला हेलिकॉप्टर प्रवास!