सोलापुरातील प्रसिद्ध विको प्रोसेसच्या जागा विक्री प्रकरणात 24 कोटी रुपयांची फसवणूक (fraud)झाल्याप्रकरणी 11 संचालकांवर गुन्हा दाखल आहे. या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश इ. आ. शेख यांनी फेटाळला आहे. हे सर्व संचालक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
अविनाश प्रकाश बोमडय़ाल, सहदेव इप्पलपल्ली, संजय भुमय्या कोंडा, यादगीर बालय्या वडेपल्ली, सर्वेशाम शंकरराव येमुल, श्रीहरी हणमय्या इराबत्ती, व्यंकटेश बालाजी बोमा, लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, वेणूगोपाल केशव अंकम, कल्पना श्रीधर रापोल, मंगम्माबाई कृष्णहरी आडम अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या संचालकांची नावे आहेत.(fraud)
विको प्रोसेसची सुमारे 87 हजार चौ. फूट जागा संचालकांनी श्री एwल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेला विक्री केलेली आहे. या जागेचे बाजारमूल्य 28 कोटी 35 लाख रुपये असताना यातील एका इमारतीचे मूल्य एक कोटी 41 लाख 78 हजार असे 29 कोटी 76 लाख 78 हजार असून, सदरचा व्यवहार चेअरमन अविनाश प्रकाश बोमडय़ाल व संचालकांनी 14 कोटी रुपयांस विक्री केला.
संचालक मंडळाने प्रत्यक्षात 18 हजार चौरसफूट जागा विक्रीची निविदा काढली होती. परंतु प्रत्यक्षात 87 हजार चौरसफूट जागा, जुनी इमारत विक्री केली आहे. या जागेच्या व्यवहारात सुमारे 20 कोटी 33 लाख 86 हजार रुपयांचा अपहार फसवणूक झाल्याचे सोलापूर अपर विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था यांनी ठपका ठेवत पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे आरोपी फरार आहेत.
अटकपूर्व जामिनासाठी संचालकांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यात सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद थोबाडे यांनी काम पाहिले.
हेही वाचा :
‘तू कसा आमदार होतो तेच बघतो’, अजित दादांचे थेट आव्हान
नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील, ते झोला घेऊन हिमालयात जातील; शिवसेना ठाकरे गटाची टीका