हातकणंगलेत धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत यांचा दावा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत(candidate search) रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने हेच असतील, असा मोठा दावा त्यांनी दिला आहे.

धैर्यशील माने याना यंदा तिकीट दिले जाणार नाही, त्यांच्या जागेवरून इतर उमेदवाराला(candidate search) संधी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच स्थानिक भाजप नेत्यांचाही त्यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता रयत क्रांती संघटनेने धैर्यशील माने यांचे समर्थन करत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे माने यांच्या उमेदवारीवरून रयत क्रांती संघटना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

मागील दोन दिवसांपासून हातकणंगले मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चा निराधार आहेत. हातकणंगलेत धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार राहतील, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना आज रयत क्रांती संघटनेने पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेची टेंभुर्णीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना हातकणंगले मधून धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे खोत म्हणाले.

भाजपने रयत क्रांती संघटना, रासप आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाट दिला आहे. महादेव जानकर, रामदास आठवले आणि मला आमदार खासदार करून मंत्री केले. भाजपवर आम्ही घटक पक्ष नाराज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यांच्यासोबत असल्याचेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

हेही वाचा :

कोल्हापुरात गस्तीपथकाने पकडला दहा लाखांचा गुटखा

अल्लू अर्जुनने शेअर केला ‘पुष्पा 2’चा मजेशीर पोस्टर, टीझरच्या रिलीज डेटची घोषणा

कोल्हापूर लोकसभेचा आखाडा कोण मारणार? शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक