अनेक राजकीय उलथापालथीनंतर अखेर कोल्हापूर लोकसभेचे(arena) चित्र आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीकडून काँग्रेस चिन्हावर शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होणार आहे. कोल्हापूरकर आता शाहू महाराज यांना साथ देणार की संजय मंडलिक यांना साथ देणार हे मात्र निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे, हे पाहू.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीकडे(arena) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे त्यांचे प्रतिस्पर्धी असतील, त्यामुळे या दोघांमध्ये काटे की टक्कर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी राज्यातल्या विविध मतदारसंघांमध्ये तुल्यबळाचा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलीय. त्यापैकीच एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून सुरुवातीला माजी खासदार संभाजी राजे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला. काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी असं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलं. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर ही झाली.
शाहू महाराजांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी स्वतः काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कंबर कसलीय. त्यांच्यासोबत माजी खासदार युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांच्यासह शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक महाराजांसाठी या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
हेही वाचा :
प्रौढ व्यक्तीने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; हायकोर्ट नेमकं काय म्हणालं?
मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; गजानन राणेंसह इतर २० साथीदारांवर गुन्हा
भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..