कोल्हापुरात गस्तीपथकाने पकडला दहा लाखांचा गुटखा

कोल्हापूर प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाने(team) गस्तीपथके नेमले आहेत. .रात्री शहरातून ही पथके दस्त घालत असतात. सोमवारी पहाटे 4:15 वाजन्याच्यां सुमारास एक बोलोरो टेम्पो पकडला यामध्ये गुटखा व इतर साहित्य असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल होता याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रात्री गस्तीच्या पथकाने शिवाजी विद्यापीठ परिसरात एका महिंद्रा पिकअप ला(team) थांबण्याचा विस्तार केला मात्र ही गाडी सुसाट वेगाने निघून गेली त्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला. राजारामपुरी परिसरात ही गाडी पकडण्यात आली.यावेळी गाडीमध्ये तौफिक शिलेदार व जावेद बागवान हे दोघेजण होते त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण गुटखा घेऊन जात असल्याचे सांगितले.

पोलिसांनी झडती घेऊन टेम्पोतील चार लाखाचा गुटखा व टेम्पो असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तौफिक व जावेद दोघांवर गुटखा तस्करी करत असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. राजारामपुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

प्रौढ व्यक्तीने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; हायकोर्ट नेमकं काय म्हणालं?

शाहरुखचा लेक करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट? ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

कोल्हापूर लोकसभेचा आखाडा कोण मारणार? शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक