सांगली बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक

पाकिस्तानातील कसाबच्या नावाने रेल्वे स्टेशन आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला मुंबईतील (terminus) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अटक करण्यात आली.

सांगली शहर पोलीस ठाण्यात दि. १४ मे रोजी रात्री मिरज व सांगली रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी रियाज कसाब या नावाने लाहोरमधून बोलतोय म्हणून फोनवरून देण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी रात्रभर दोन्ही स्टेशनवर झाडाझडती घेतली. मात्र, झडतीनंतर हा फोन धमकी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कसाबच्या नावाने फोनवरून बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍या व्यक्तीचा तांत्रिक तपास करण्यात आला. धमकी प्रकरणी सचिन मारूती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय ३५ रा.शिंदे मळा तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा मूळ गाव- गोपवाडी, लोहारा, ता. पुसद जि. यवतमाळ) याला अटक करण्यात आली. तो कौटुंबिक वादातून वैफल्यग्रस्त असून यापूर्वी त्यांने मुंबई, पुणे, नागपूर पोलिसांनाही रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तो भुरट्या चोर्‍याही करत असल्याने त्याच्यावर चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

”मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे” शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

‘RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,’ हर्षा भोगले यांनी सुनावलं, ‘किमान तुम्ही धोनीला…’

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल