मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

जो आम्हाला मारतो त्याची आम्ही पूजा करणार नाही(attack). जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील तेच करू जे त्याच्या लायकीचे आहे. आता हेच होत आहे. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही पाकिस्तानला कठीण जात आहे. तुम्ही नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन दाखवा.

पुढील 6 महिन्यात पीओके भारताचा होईल हे तुम्हाला दिसेल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे(attack) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. पालघरमधील सभेला संबोधित करताना त्यांनी पीओकेबाबत हा दावा केला. यावरच ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात येतेय.

दहा वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे… तुम्ही १० वर्ष काय केलं? असा सवाल करत संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय तर योगी आदित्यनाथ यांनी त्यांची उत्तरप्रदेशची खुर्ची राहते का ते पाहवं…मोदी पुन्हा पंतप्रधान हवेत… दहा वर्ष काय झोपा काढल्या? अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

हेही वाचा :

‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडीओ व्हायरल

तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर

‘धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने…,’ दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा’