गर्मीला करा बाय-बाय! लिंबू-पुदिन्याचे सरबत घरी बनवा अगदी सोप्या रेसिपीने

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पुदिन्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थ (lemon)बनवण्यासाठी केला जातो. पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कारण पुदिना खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा निर्माण होतो. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात.

राज्यभरात सगळीकडे लवकर उन्हाळा ऋतूला सुरुवात होणार आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. लिंबामध्ये असलेले विटामिन सी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीर ताजेतवाने आणि थंडगार (lemon)ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सरबत तुम्ही बाहेर जाताना किंवा इतर वेळी घरी असल्यानंतर पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य:
पुदिन्याची पाने
लिंबाचा रस
साखर
मीठ
बर्फाचे तुकडे
पाणी
सोडा

कृती:
लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने, चवीनुसार मीठ, साखर आणि बर्फाचे तुकडे टाकून वाटून घ्या.
त्यानंतर त्यात पुन्हा एकदा लिंबाचा रस टाकून(lemon) मिक्सरमधून फिरवून घ्या.
तयार करून घेतलेली पेस्ट गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये तयार केलेली पेस्ट ओतून घ्या.
नंतर त्यात सोडा टाकून वरून बारीक क्रश करून घेतलेली पुदिन्याची पाने टाकून पिण्यासाठी सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला लिंबू पुदिन्याचा सरबत.

हेही वाचा :

राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!

केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा

IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर