मुंबई : भांडवली बाजार नियामक संस्था सिक्योरिटीज अँड एक्सजेंच बोर्ड ऑफ इंडिया(mutual funds) म्हणजेच सेबीने (SEBI) फ्रन्ट-रनिंग च्या प्रकरणात क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली केली आहे. आपल्या या कारवाईत सेबीने क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या अनेक ठिकाणांवर शोधमोहीम राबवत जप्तीचीही कारवाई केली आहे. माध्यमांतील रिपोर्टनुसार मुंबई आणि हैदराबाद या दोन ठिकाणांवर जप्ती आणि शोधमोहीम राबवण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रारी फ्रन्ट रनिंग प्रकरणात क्वांट डीलर्स आणि या प्रकरणाशी निगडित असलेल्या लोकांची चौकशी करण्यात आली होती. क्वांट म्यूचुअल फंडाचे(mutual funds) मालक संदीप टंडन आहेत. इस 2017 साली सेबीने या फंडाला परवानगी दिली होती. गेल्या काही महिन्यापासून या फंडाने चांगली प्रगती केलेली आहे.
सध्या या फंडाची संपत्ती 90 हजार कोटी रुपये आहे. हीच संपत्ती 2019 मध्ये फक्त 100 कोटी रुपये होती. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात या फंडाची संपत्ती 50 हजार कोटी रुपये झाली होती. क्वांट म्यूच्यूअल फंडाच्या पोर्टफोलिओत 26 योजना आणि 54 लाख फोलिओंचा समावेश आहे.
फ्रंट रनिंग ही एक बेकायदेशीर कृती आहे. या प्रक्रियेत फंड मॅनेजर किंवा ब्रोकरला भविष्यातील मोठ्या ट्रेडबद्दल अगोदरच कल्पना असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रेड्समध्ये मॅनेजर किंवा ब्रोकर्स अगोदरच गुंतवणूक करून ठेवतात आणि मोठा नफा कमवतात.
सेबीने आपल्या टीमच्या माध्यमातून क्वांट म्यूच्यूअल फंडात करण्यात आलेल्या कथित संशयास्पद ट्रेडिंग पॅटर्नला ओळखले होते. त्यानंतर सेबीने क्वांट म्यूच्यूअल फंड हाऊसवर लक्ष ठेवले होते. म्यूच्यूअल फंडातील फ्रन्ट रनिंग रोखण्यासाठी सेबीने कठोर नियमावली केलेली आहे. गेल्या काही काळापासून त्यामुळेच सेबीकडून अशा प्रकारच्या प्रकरणांत कठोर कारवाई केली जाते.
गेल्या पाच वर्षांत या फंडाने चांगली कामगिरी केलेली आहे. हा स्मॉल कॅप फंड सध्या 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त फंडाला मॅनेज करतो. या फंडाच्या पोर्टफोलिओत बड्या कंपन्याचे शेअर्स आहेत. सेबीने केलेल्या या कारवाईचा फटका गुंतवणूकदारांना बसू शकतो. तसेच या फंडाबाबतची विश्वासार्हताही कमी होऊ शकते. खरंच गुंतवणूकदारांना नुकसान झाले का ? हे भविष्यात लवकरच कळेल.
दरम्यान, क्वांट म्यूच्यूअल फंडाने या कारवाईनंतर स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही सेबीला सर्व बाजूंनी सहकार्य करू, असे या फंडाने सांगितले आहे.
हेही वाचा :
बेधुंद तरुणाचा ‘कार’नामा! दुकानासमोर बसू न दिल्याच्या रागातून ३ दुचाकींना उडवले
माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय; भाजपला रामराम, आज शरद पवार गटात प्रवेश?
लाल चुडा, भांगात कुंकू ; सोनाक्षीचा रिसेप्शन लूक चर्चेत तर…