पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्…

इंडियन प्रिमिअर लीगच्या 16 व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या(six the musical) संघाने तब्बल 106 धावांनी दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर विजय मिळवला. आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या या सामन्यामध्ये कोलकात्याच्या संघाने उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऋषभ पंतच्या संघाला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत.

273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 166 धावांवरच तंबूत(six the musical) परतला. विशेष म्हणजे या सामन्यात ऋषभ पंतने आपल्या संघाला लक्ष्याचा जास्तीत जास्त जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत उत्तम फलंदाजी केली. पंतचा फलंदाजी करताना चांगला सूर गवसला. पंतने लगावलेला एक षटकार पाहून तर सामना पाहण्यासाठी आलेला केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खान स्वत: जागेवर उभा राहून टाळ्या वाजवू लागला.

12 व्या ओव्हरमध्ये दिल्लीची धावसंख्या 107 वर 4 बाद अशी होती. व्यंकटेश गोलंदाजी करत असताना ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ऋषभ पंतने लेग साईडला चेंडू असा काही हवेत टोलवला की चेंडू कुठल्या दिशेने गेला हे पाहण्याचं कष्टही ऋषभने घेतलं नाही. कमरेत वाकून ऋषभने 37 धावांवर असताना लगावलेला हा षटकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पंतचा हा ‘नो लूक सिक्स’ पाहून त्याच्या फलंदाजीचं कौतुक करण्यासाठी शाहरुख खान आपली खुर्ची सोडून उभा राहिला आणि टाळ्या वाजवू लागला.

या ओव्हरमध्ये पंतने तब्बल 30 धावा केल्या. पंतने या ओव्हरमद्ये 4,6,6,4,6,4 अशी फटकेबाजी केली. याच ओव्हरमध्ये पंतने आयपीएलमधील 17 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र या फटकेबाजीबरोबरच पंतच्या ‘नो लूक सिक्स’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तुम्हीच पाहा हा षटकार…

https://twitter.com/i/status/1775577234255892580

टॉस जिंकून कोलकात्याच्या संघाने प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुनील नरेनने 39 बॉलमध्ये 85 धावा, अंग्रकिश रघुवंशी 27 बॉलमध्ये 52 धावा आणि आंद्रे रस्सेल 19 बॉलमध्ये 41 धावांच्या जोरावर कोलकात्याने तब्बल 272 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या फलंदाजांसमोर दिल्लीचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. सामन्यातील पहिल्या डावात 18 षटकार आणि 22 चौकारांचा पाऊस पडला. 226.67 च्या सरासरीने कोलकात्याने 7 गड्यांच्या मोबदल्यात आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने रविवारीच मुंबईविरुद्ध 277 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये कोलकात्याला जास्त धावा न करता आल्याने हैदराबादचा हा विक्रम अबाधित राहिला.

273 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतच्या(six the musical) नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघातील पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने तशी बरी सुरुवात केली. मात्र दुसरी ओव्हर संपण्याआधीच शॉ तंबूत परतला. मिचेल मार्शच्या रुपात तिसरी ओव्हर संपण्याआधी दुसरी विकेट पडली. चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पोरेल तंबूत परतला. वॉर्नर संघाची धावसंख्या 33 वर असताना बाद झाला. वेगाने धावा करत पंत आणि स्टब्सने पुन्हा दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या.

मात्र मोठे फटके मारण्याच्या नादात पंत 13 व्या ओव्हरला संघाची धावसंख्या 126 असताना तंबूत परतल्या. अक्सर पटेल भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर स्टब्सच्या रुपात संघाची धावसंख्या 159 वर असताना सातवी विकेट पडली. एकूण धावसंख्येत 7 धावांची भर घालत दिल्लीचे तळाचे 3 गडी तंबूत परतले. दिल्लीला सर्व 20 ओव्हरही खेळून काढता आल्या नाहीत. कोलकात्याने हा सामना 106 धावांनी जिंकला.

हेही वाचा :

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याची ९५ लाख रूपयांची पाणीपट्टी थकली

पती आणि प्रियकर दोघांसोबत राहणार; तीन मुलांच्या आईची विचित्र मागणी, पतीने अमान्य करताच…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी Good News, केंद्र सरकारने दिली अशी परवानगी