माढा लोकसभा मतदार संघात आता नवा ट्वीस्ट(trumpet) निर्माण झाला आहे. माढा मतदार संघातून महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. अशातच आज धैर्यशील मोहिते पाटील हे पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. त्याचबरोबर आजच मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
माढा मतदार संघाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे(trumpet) दिसत आहेत. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील नाराज आहेत. आता हीच नाराजी बंडखोरीमध्ये बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा होत्या.
अखेर आज धैर्यशील मोहिते पाटील हे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील हे १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून १६ एप्रिल रोजी ते निवडणूक अर्ज दाखल करुन तुतारी चिन्ह घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणूकीत मोहिते पाटील यांनी अकलूजमधून रणजितसिंह निंबाळकरांना एका लाखांपेक्षा अधिकचे लीड दिले होते. त्याचसोबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने फलटणचे रामराजेही उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे माढ्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
गुगलचं यूजर्सना खास गिफ्ट! फोटो एडिटिंगचे एआय टूल्स सगळ्यांना मिळणार मोफत
आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान
भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा