राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का(faith)बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजित पाटील यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याने आर्थिक नाकेबंदी झाली आहे. प्रयत्न करूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर अभिजित पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांची संस्था असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना(faith) वाचविण्यासाठी तुम्ही घ्याला तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे भूमिका कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्यासमोर मांडली आहे. त्यामुळे आता अभिजित पाटीलच यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत अभिजित पाटील हे करमाळ्यातील सभेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) शुक्रवारी जप्तीची कारवाई केली आहे. बॅंकेने विठ्ठल कारखान्याची तीन गोदामेही सील केली आहेत. त्या गोदामात तब्बल एक लाख साखर पोती आहेत.
विठ्ठल साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये थकीत आहेत. या प्रकरणी बॅंकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हाही दाखल आहे. त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.
दरम्यान, जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी शुक्रवारी रात्री संचालक मंडळ आणि विश्वासून सहकाऱ्यांची बैठक बोलावली हेाती. त्या बैठकीत निर्णयाचे स्वातंत्र अभिजित पाटील यांना देण्यात आले होते. तत्पूर्वी अभिजित पाटील यांनी सूत्रे हलवत कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही, त्यामुळे अभिजित पाटील आर्थिक कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.
विठ्ठल सहकारी कारखान्यावर आज सकाळी अभिजित पाटील गटाचे राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांची संस्था आहे. या कारखान्यावर लाखो शेतकऱ्यांचे संसार अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची संस्था वाचविण्यासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल. त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही आहोत. पण, शेतकऱ्यांची संस्था वाचावा. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मांडली.
यासंदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, राज्य सहकारी बॅंकेच्या जप्तीनंतर पुढे काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले आहे. मात्र, मी अजून मी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
हेही वाचा :
महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल; कारवाईची शक्यता
नरेंद्र मोदींच्या सभेला ‘ती’ व्यक्ती उपस्थित राहणार; कोल्हापुरात चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा