पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील : संजय राऊतांचं मोठं विधान

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार(hpe support) पाठिंबा देतील, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान पदासाठी अनेक नावांची चर्चा होत आहे. त्यात आता संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधान पदासाठी घेतलंय.

इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, काँग्रेसचे(hpe support) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नावेही सुचवण्यात आली होती. पंतप्रधान पदाच्या या शर्यतीत राऊतांनी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत?, असा सवाल उपस्थित केला.

उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही, अशा शब्दांत राऊतांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी विशाल पाटील यांच्यावर देखील भाष्य केलं. विशाल पाटील हे समजुतदार आहेत. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे.विशाल पाटलांच्या मनात देखील शिवसेने बदल प्रेम आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काल महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय राऊत देखील उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी राऊतांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत काँग्रेस आणि ठाकरेसेनेचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. त्यावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा :

पहाट शपथविधीचे भूत हळूहळू उतरते आहे….

“राजर्षी शाहू महाराजांना साजेसं कोणतं काम छत्रपती घराण्यानं केलं?” मंडलिकांच्या पुत्राचा हल्लाबोल

मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?