लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील डझनभर नेते आमच्या पक्षात येणार; जयंत पाटलांचा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार(political action committees) असून महायुतीतील १० ते १२ बडे नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या नेत्यांसोबत माझा करार झाला आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या(political action committees) प्रचारासाठी जयंत पाटील शुक्रवारी (ता. १९) पंढपुरात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० पैकी ७ जागांवर नक्कीच विजय होणार, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधील १० ते १२ बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील. या नेत्यांचा माझ्यासोबत करार झाला आहे. असा मोठा दावाही जयंत पाटील यांनी केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किमान ६० आमदार निवडून येतील, असा आमचा प्रयत्न असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

भारतीय जनता पक्षाबाबत राज्यातील जनतेच्या मनात संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट पाहत असून त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या ३२ ते ३३ जागा निवडून येतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

सांगलीत योग्य लढत व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झाले, हे आता बाहेर सांगणे योग्य होणार नाही. जे लोक वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावे, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?

“राजर्षी शाहू महाराजांना साजेसं कोणतं काम छत्रपती घराण्यानं केलं?” मंडलिकांच्या पुत्राचा हल्लाबोल

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील : संजय राऊतांचं मोठं विधान