हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास स्वाभिमानी शेतकरी (farmer)संघटनेचे राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने येथून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर व उल्हास पाटील यांना लढण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. या तिघांच्या नावाची शिफारस शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केली आहे. शिवसेनेने येथून उमेदवार दिल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. महायुतीचे धैर्यशील माने, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, वंचित बहुजन विकास आघाडीचे डी. सी. पाटील व शिवसेना अशी ही लढत होईल. 4 एप्रिल रोजी शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे.
हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेकडे आहे. येथून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, असा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. मात्र(farmer) राज्यातील नेत्यांनी राजू शेट्टी हे शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असतील तरच त्यांना पाठिंबा द्यावा; अन्यथा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करावा, अशी भूमिका मांडली. दरम्यान शेट्टी यांनी दोनवेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर या भूमिकेवर शेट्टी ठाम असल्याने तेथून शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार देणार आहे.
राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. सोमवारी रात्रीही राऊत व शेट्टी यांच्यात चर्चा झाली. कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. कोल्हापूरची जागा शाहू महाराज यांना दिल्याने हातकणंगलेची जागा कोणत्याही परिस्थितीत लढविण्यावर शिवसेना ठाम आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याशीही चर्चा करण्यात आली. मात्र ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यावर शेट्टी ठाम राहिल्याने याबाबतचा निर्णय नंतर कळविला जाईल, असे शेट्टी यांना सांगण्यात आले आहे. तसेच संपर्क प्रमुखांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागविण्यात आल्यामुळे येथून शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झाले आहे.
निवेदिता मानेंचे नाव अचानक चर्चेत आल्याने खळबळ; वृत्ताचा विपर्यास : धैर्यशील माने
शिंदे शिवसेनेने जाहीर केलेल्या काही जागांवरील उमेदवार बदलले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचवेळी शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर धैर्यशील माने यांच्याऐवजी श्रीमती निवेदिता माने यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली. भाजपच्या विरोधामुळे शिंदे गट ही भूमिका घेत असल्याचेही सांगितले जात होते. मात्र धैर्यशील माने यांनी या वृत्ताचा इन्कार केला. शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा :.
ठाकरेंचा भाजपला दे धक्का…; ‘तो’ नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती
देशभरात लागू झाला ‘वन व्हीकल वन फास्टॅग’ नियम; काय आहे कारण?.
17 रुपयांची साडी…2 कोटींची गाडी…महायुतीत निवडणुकीच वातावरण तापलं