‘तू आधी इथून निघ’, लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर,

रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवरअभिनेता(Actor) संतापले होते ऋषी कपूर… नीतू कपूर यांचा खुलासा

लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आई नीतू कपूर बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी अनेक किस्से सांगितले होते. रिद्धिमानं सांगितलं की तिला सलमान खान खूप आवडायचा ती त्याची फॅन होती. तर रणबीरनं सांगितलं की तो त्याच्या रुममध्ये संजय दत्तचं पोस्टर लावायचा. त्यावेळी नीतू कपूर यांनी रिद्धिमाच्या लग्नातील सलमानचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. तो म्हणजे त्यावेळी सलमान खान पाहुण्यांना मद्यपान देत होता.

कपिलनं रिद्धिमाला तिचा आवडता कलाकार कोण असा प्रश्न विचारला तेव्हा तिनं तिच्या आई-वडिलांचं नावं घेतलं. तर रणबीरनं लगेच तिला टोकलं आणि म्हणाला “रिद्धिमाच्या रुममध्ये सलमान खानचे पोस्टर होते.” यावर कपिलनं विचारलं की “सलमानतर रिद्धिमाच्या लग्नात सगळ्यांना मद्यपान देत होते.” त्यावर नीतू म्हणाल्या, “हो.” त्यानंतर सांगितलं की सलमान म्हणाला, “मी बारची जबाबदारी सांभाळणार. मी ठीक आहे म्हणाले. सलमान सगळ्यांना मद्यपान देत होता. काही वेळात वेटर येऊन म्हणाले की दारू संपायला आली आहे.”

त्यावर ऋषी कपूर म्हणाले “मी तर खूप आणली होती, संपली कशी? तेव्हा आम्ही पाहिलं की आलेले पाहूण हे ड्रिंक्स फेकत होते आणि ते परत परत घ्यायला जात होते, कारण सलमान खान तिथे होता.” तेव्हा ऋषी कपूर तिथे जाऊन सलमानला म्हणाले की “यार, तू तिथून बाहेर निघ.”

रिद्धिमा साहनी विषयी बोलायचे झाले तर ती रणबीरपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तिचं वय 43 आहे. रिद्धिमाचं लग्न 2006 ला झालं. रिद्धिमाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती एक जूलरी डिझायनर म्हणजेच दागिणे डिझाइन करते. दरम्यान, रिद्धिमा आणि रणबीर कपूर यांनी यावेळी ऋषी कपूर यांच्याविषयी देखील अनेक गोष्टी सांगत होते. त्यांनी सांगितलं की “जर ऋषी कपूर यांनी त्यांच्या मित्रांचा फोन उचलला तर ते फोनवर काही बोलायचे नाही, थेट कट करायचे.” दरम्यान, रणबीर विषयी बोलायचे झाले तर तो लवकरच ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

बिंदू चौक ते गांधी मैदान प्रचंड सभा ते विराट सभा

17 रुपयांची साडी…2 कोटींची गाडी…महायुतीत निवडणुकीच वातावरण तापलं

लोकल ट्रेनमध्ये १५ वर्षीय मुलीला किस करण्याचा प्रयत्न, वडिलांसह प्रवाशांनी…