धक्कादायक ! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

वाद-विवादातून पत्नीवर चाकूने सपासप वार करुन पतीने (suicide)आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नसीमा मुल्ला (suicide)(वय ३२), अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमजद मुल्ला टेम्पोचालक आहे. त्याची पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. नसीमाचे नातेवाईक बाणेर भागात राहायला आहेत. नसीमा आणि अमजद नातेवाईकांना भेटायला पुण्यात आले होते.
बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये ते उतरले होते. सोमवारी (१३ जानेवारी) सकाळी दोघांमध्ये हॉटेलच्या खोलीत वाद झाले. नंतर अमजदने पत्नी नसीमावर चाकूने वार केले. अमजदने स्वत:च्या गळ्यावर, तसेच पोटावर चाकूने वार केले. दोघे जण गंभीर जखमी झाले.

हाॅटेलमधील खोलीत सुरू असलेला आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण अधिक तपास करत आहेत.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा!

तीन वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडच्या बेस्टफ्रेंडलाच पटवलं, अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का

सांगलीत पोलीस स्टेशनसमोरच फ्री स्टाईल हाणामारी: नेमका काय प्रकार घडला?