धक्कादायक आता आणखी एका ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार

सूरत, इंदोरनंतर काँग्रेसला(Congress) आणखी एक मोठा झटका बसला आहे. आोदिशाच्या पुरीमधील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाहीय, असं सुचारिता मोहंती यांनी सांगितलं.

पार्टी फंडिंगशिवाय निवडणूक प्रचार(Congress) मला शक्य नाहीय. म्हणून मी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय असं सुचारिता मोहंती म्हणाल्या. पुरी येथून भाजपाकडून संबित पात्रा निवडणूक रिंगणात आहेत. संबित पात्रा भाजपा प्रवक्ते असून टीव्ही वर विविध डिबेट शो मध्ये भाजपाची बाजू ते प्रखरपणे मांडत असतात.

काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना सुचरिताने पत्र लिहिलं आहे. पुरी लोकसभा मतदारसंघात आम्हाला प्रभावी पद्धतीने प्रचार करता येत नाहीय. कारण पार्टीने मला फंड देण्यास नकार दिला आहे. “मी याबद्दल जेव्हा, ओदिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी, तुम्ही तुमच्या फंडाची व्यवस्था करा असं उत्तर दिलं”

हेही वाचा :

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?

‘या’ कारणांसाठी बच्चू कडूंनी दिला राजू शेट्टींना पाठिंबा