विराटच्या वादग्रस्त विकेटवर सिद्धूचं मोठं वक्तव्य

कोलकाता नाईट रायडर्ससोबत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा(rcb) पराभव झाला.


कोलकाता नाईट रायडर्ससोबत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (rcb)पराभव झाला. आणि आरसीबी हंगामातील सलग 6 वा सामना गमावला. पण, या सामन्यात विराट कोहलीच्या विकेटवरून बराच गदारोळ झाला. खुद्द कोहलीही त्याच्या विकेटवर चिडलेला दिसत होता.

यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित झाला आहे की, कोहली खरंच आऊट की नॉट आउट? दरम्यान, प्रसिद्ध समालोचक आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने विराटच्या वादग्रस्त विकेटवर मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू?

ईडन गार्डन्सवर केकेआरने दिलेल्या 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली 18 धावा करून फुल टॉस बॉलवर आऊट झाला. त्यानंतर कोहलीने नो बॉलसाठी रिव्यू घेतला. पण, तिसऱ्या पंचानेही कोहलीला आऊट दिला.

पॅव्हेलियनमध्ये परतताना विराट चांगलाच संतापलेला दिसत होता. पण, कोहली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना कॉमेंट्री करत असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तो स्पष्ट शब्दात म्हणाला, ‘मी छाती ठोकून सांगतो की कोहली नॉट आऊट आहे. एवढ्या मोठ्या सामन्यात तुम्ही कोहलीला असे कसे आऊट देऊ शकता.
काय होतं संपूर्ण प्रकरण?

केकेआर विरुद्ध आरसीबी सामना संपला. पण विराट कोहलीच्या विकेटची चर्चा अजूनही सोशल मीडियावर सुरू आहे. खरं तर, बेंगळुरूच्या डावात तिसरे षटक करणाऱ्या हर्षित राणाने एक चेंडू टॉस बॉल टाकला, जो विराटच्या बॅटला लागला आणि हवेत उंच गेला आणि गोलंदाजाने झेल घेतला, त्यानंतर पंचांनी कोहलीला बाद घोषित केले.

विराटने लगेचच नो बॉलचा रिव्यू घेतला. तिसऱ्या पंचानेही आऊट दिल्यावर कोहली संतापला. मैदान सोडताना तो अंपायरशी वाद घालतानाही दिसला. तो गेल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला कर्णधार फाफ डू प्लेसिसही बराच वेळ पंचांशी बोलतांना दिसला.

हेही वाचा :

टीसमधील पीएचडी स्कॉलरला दोन वर्षांसाठी केले निलंबित;

मी लोकसभा बोलतेय भाग- 18:राजीव गांधींच्या कार्यकाळात संगणक ,दूरसंचार क्रांती

निमित्त – मी म्हणतंय ऊन, सावली ठेवू जपून!