सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु

लाेकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात आचारसंहिता(driver) लागू झाली आहे. या काळात जिल्ह्यात अवैध गाेष्टींवर आळा बसावा यासाठी पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. पाेलिसांनी सांगलीत विनापरवाना वाहतूक होत असलेली तब्बल २६ लाखाची चांदी जप्त केली आहे.

निवडणूक(driver) आचारसंहितेमुळे सांगलीवाडी नाक्यावर वाहनाची तपासणी गस्ती पथकाकडून करण्यात येते. यावेळी एका वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी मोटारीमध्ये २५ लाख ९२ हजार ११४ रूपये किंमतीचे ४१ किलो ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे तयार दागिने आढळून आले.

वाहन चालक देवेंद्र बाबूलाल माळी (वय २०, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) याच्याकडे या चांदीच्या दागिन्याची वाहतूक करण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळला नाही. यामुळे गस्ती पथकातील निखील म्हांगोरे, शंकर भंडारी व प्रमोद भिसे या कर्मचार्‍यांनी चांदीच्या दागिन्यासह वाहन चालकाला ताब्यात घेतले.

या प्रकरणी आचारसंहिता विशेषाधिकार समिती व प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून या दागिन्याचा उगम, विल्हेवाट यांची चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

मोदींचा फोटो लावून प्रकाशअण्णा आवाडेंनी हातकणंगलेत महायुतीविरोधात ठोकला शड्डू!

भाविकांसाठी आनंदाची बातमी! ‘चैत्रोत्सवात’ सत्पश्रृंगी देवीचं मंदिर २४ तास राहणार खुलं

टेन्शन वाढलं! राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट, फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक