गायक मिलिंद गाबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Singer) व्हायरल होत आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये मिलिंद गाबाने राडा केला असल्याचे समोर आले आहे. टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या मिटिंगमध्ये मद्य प्राशन करण्यास सुरुवात केली. यावर आक्षेप घेणाऱ्याला गाबाने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.
पापाराझी असलेल्या विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ(Singer) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गायक मिलिंद गाबा हा मिटिंगमध्ये बसला आहे. अचानकपणे तो मद्य प्राशन करण्यास सुरुवात करतो. त्याच्या शेजारची व्यक्ती त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी त्यांच्यात वाद होतात आणि हाणामारी होते.
या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत आहेत. तर काहींनी मिलिंद गाबाच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे. व्हायरल व्हिडीओवर टी-सीरिज अथवा मिलिंद यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
मिलिंद गाबा हा प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या काही हिट गाण्यांमध्ये ‘नजर लग जायगी’, ‘यार मोड दो’ आणि ‘मैं तेरी हो गई’ यांचा समावेश आहे. अभिनेता म्हणून त्याने ‘स्टुपिड 7’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले. याशिवाय तो ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्येही सहभागी झाला होता आणि 29 दिवसांनंतर तो बाहेर पडला होता.
हेही वाचा :
जातीपातीचे राजकारण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
धोनीचा फॅन, जसा तो मैदानात कूल होता, तसाच…, कोल्हापूरच्या स्वप्नीलची पहिली प्रतिक्रिया
स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड