…म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक; शरद पवारांचा थेट निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला ईडीने(target) अटक केली आहे. त्यांच्या अटकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेच्या कारणावर बोट ठेवलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं. मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली, म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं गेलं.

अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. असे अनेक राज्याचे मुख्यमंत्री तुरुंगात(target) टाकले आहेत. या देशाला हुकूमशाही वाटेवर घेऊन चालले आहेत. मात्र यांना उत्तर द्यावं लागेल. आपल्याला उत्तर मागताना निवडणुकीतून द्यावं लागेल, असं शरद पवार म्हणालेत.

यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे, असं शरद पवार म्हणालेत. आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याची ताकद कोणाकडे आहे. हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. देशाचे राजकारण योग्य दिशेने न्यायचा असेल. तर सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीला साथ देणं गरजेचं आहे. आम्ही सर्व एकत्र येऊन निवडणुकीला समोर जात आहोत. खात्री आहे जनताही आम्हाला साथ देईल, असं शरद पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं. त्यांनी काय सांगितलं, त्यांचं आधीचं भाषण पण पाहा… देशाचा प्रधानमंत्री मात्र त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन लक्षात ठेऊन बोलायला पाहिजे. तुम्ही प्रधानमंत्री म्हणून काय करणार ते सांगा… पंडीत नेहरू यांनी स्वतःचा विचार केला नाही, हा देश संसदीय लोकशाही प्रमाणे चालवण्याचा प्रयत्न केला. देशासाठी योगदान दिले. याचा अर्थ पाहा आजच्या पंतप्रधानांची मानसिकता काय ते पाहा, असं शरद पवार म्हणालेत.

पन्नास दिवसात महागाई कमी करतो अस म्हणतात. मात्र तसे झाले का? नाही मात्र वाढल्या आहेत. संसार चालवणे अवघड झाले आहे. त्यांनी सर्वसामान्यांना संकटात टाकण्याचे काम केले. एका संस्थेने अहवाल तयार केला त्यात तर बेरोजगारी वाढली आहे. शेतीची अवस्था बघा, फळबागांना पाणी नाही, शेतमालाला भाव नाही. दुष्काळ पडला मी कृषिमंत्री होतो, आम्ही लोकांनी 25 हजारांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांना अडचणीत सत्तेचा वापर करायचा हे कळलं पाहिजे. मात्र सत्तेचा गैरवापर केला जातोय. देश स्वतंत्र देश आहे. प्रत्येकाला अधिकार असला तरी त्यांच्या अधिकारावर गदा येत आहे, असं मत शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मांडलं.

हेही वाचा :

मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…

आजपासून अर्ज छाननी, कोल्हापुरातून 28 तर हातकणंगलेतून 36 उमेदवारांचे अर्ज

हातकणंगलेत माने-पाटलांचं ‘या’ उमेदवारांनी वाढवलं टेन्शन; ‘सेम टू सेम’ नावाने घोळ होणार…