जेव्हा निवडणूक होत असतात त्यावेळी आपण गृहीत(politics today) धरलं पाहिजे. आपण ज्या चिखलात उतरणार आहोत त्याचे शिंतोडे आपल्यावरही उडणार आहेत. राजकारण हे वाईट नाही. पण राजकारणात असणारे खेळाडू वाईट पध्दतीने खेळतात. म्हणून राजकारण वाईट झाले आहे. विरोधकांनी सांगितला आहे, की प्रचाराची पातळी खाली नेऊ नका. मात्र सुरुवात त्यांनीच केली आहे.
छत्रपतींच्या विरोधात(politics today) एक सामान्य माणूस उभा राहतोय, ही देखील पहिली वेळ नाही. त्यामुळे छत्रपतींचा अपमान, कोल्हापूरच्या अस्मितेचा अपमान आणि कोल्हापूरकरांचा अपमान या गोष्टी मला पटत नाहीत. अशा शब्दात गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा खेळ आहे, राजकारण आहे. तुम्ही उमेदवार आहात आम्हीही उमेदवार आहोत. तुमच्याकडे चेहरा नाही म्हणून महाराजांना तुम्ही गळ घातली. महाराज मला आदरणीय आहेत. मी त्यांच्या घरची आहे. पण त्यांचा वापर करणाऱ्यांच्यावर विश्वास नाही. त्यांची ढाल करून लढणाऱ्यांवर त्यावर माझा आक्षेप असणार आहे. केवळ आणि केवळ छत्रपतींचा वापर त्यांच्याकडून सुरू आहे. अशा शब्दात गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
या निवडणुकीत मी वैयक्तिक पातळीवर टीका करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, की कुणीही वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. विरोधकांना एक सल्ला आहे. जर ही निवडणूक महाडिक विरुद्ध पाटील करत असतील. तर मी गप्प बसणार नाही. माझे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. त्या शब्दात शौमिका महाडिक यांनी इशारा दिला आहे.
महायुती म्हणून खासदार संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचं आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यामागे कसूर ठेवायचा नाही. आयपीएलचे सामने सुरू झाले आहेत. तसेच आपली ही मॅच इथे सुरू झालेली आहे. त्यामुळे कोणीही विलंब करू नका. आपली टीम चांगली आहे. विरोधकांकडे कॅप्टनचा चेहरा लावण्यासाठी जागा नाही. आमचा कॅप्टन एकच पंतप्रधान नरेंद्र मोदी. राहुल गांधींचा फोटो लावून ते प्रचार करत नाहीत असा टोला शौमिका महाडिक यांनी लगावला.
दर पाच पाच वर्षांनी निवडणुका होत असतात, प्रत्येक निवडणुकीला समीकरण बदलत असते. जर कोण विधानसभेचा संदर्भ घेऊन म्हणत असेल की आम्ही लोकसभेला एक लाखाचे लीड देऊ तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण आपलं काम कुठपर्यंत गेले हे जनतेला माहित आहे. असा टोला त्यांनी दक्षिणच्या काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.
महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत असताना गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक भाषणाला उभा राहिल्यानंतर व्यासपीठावरील प्रमुख नेत्यांचे आभार मानले. शिवाय अमल महाडिक यांचे नाव घेताना त्यांनी भावी आमदार असा उल्लेख केला.
हेही वाचा :
कोल्हापुरात गणेशोत्सवात ध्वनीप्रदुषण करणाऱ्या ३९७ मंडळांवर खटले
भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत ‘या’ नेत्याची थोरल्या पवारांना साथ
अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले