कथा कुणाची, व्यथा कुणाला घाटगेंची इच्छा लागे पणाला!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक(pain) लढवून आमदार होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोर्चे बांधणी करणाऱ्या समरजित सिंह घाटगे यांची”कोणता झेंडा घेऊ हाती?”अवस्था झाली आहे आणि हे राजकारणातले संदर्भ बदलल्याने घडते आहे. सध्या ते”सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली”या म्हणीला सामोरे जात आहेत. या मतदारसंघावर विशेष प्रेम आणि लक्ष असलेल्या शरद पवार यांना या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांचा पराभव करून झालेली चूक दुरुस्त करावयाची आहे आणि ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहेत.

अल्पसंख्य समाजाचा चेहरा म्हणून शरद पवार यांनी हसन मुश्रीफ (pain)यांना सत्तेच्या वर्तुळात आणले. पण मुश्रीफ यांनी काही अपरिहार्य कारणामुळे अजित दादा पवार यांना साथ दिली. त्याचा जोरदार धक्का शरद पवार यांना बसला आणि त्यांनी कोल्हापूरच्या दसरा चौकात जाहीर सभा घेऊन कागलच्या गैबी चौकातली चूक कबूल करून तिथल्या मतदारांची माफी मागितली. नाशिकच्या येवला मतदार संघातून छगन भुजबळ यांना आणि कोल्हापूरच्या कागल मधून असं मुश्रीफ यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत. हे दोन्ही मतदारसंघात त्यांनी अतिशय प्रतिष्ठेचे केलेले आहेत.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे नव्या दमाच्या 20 तरुणांना उमेदवारी देणार आहेत. कागल मधून त्यांच्यासमोर समरजीत सिंह घाटगे हा तरुण चेहरा आहे पण सध्या समरजीत हे भारतीय जनता पक्षात आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासातले म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी हातातील कमळ सोडून हाती तुतारी घ्यावी असे प्रयत्न सुरू आहेत.

समरजीतसिंह यांची राजकीय व्यथा हसन मुश्रीफ यांच्या ईडी कारवाईच्या कथेपासून सुरू होते. हसन मुश्रीफ यांची आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या यांनी बाहेर काढली. त्यानंतर मुस्लिम यांच्या मागे ईडी लागली. गैबी चौकातलं त्यांचं घर, गडहिंग्लज चा गोड साखर कारखाना, संताजी घोरपडे साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक इथे ईडीने अनेकदा धाडी टाकल्या.

आता त्यांना अटक होणार आणि आपला राजकीय मार्ग सुकर होणार या आनंदात समर्जित सिंह घाटगे होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दिनांक 2 जुलै 2022 मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. तेव्हा हसन मुश्रीफ यांनी अजितदादा पवार यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतली. मुश्रीफ हे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. आणि येडी ची कथा त्यांच्यासाठी संपली. आणि तेथून समरजित सिंह घाटगे यांची राजकीय व्यथा सुरू झाली.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाजाची सिंह यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक अपक्ष पातळीवर लढवली. ते पराभूत झाले. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांचा हात धरून ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. भाजपने त्यांना कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष केले. त्यांच्यावर म्हाडाची जबाबदारी सोपवली. ते देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासातले बनले. त्यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली.

मतदारसंघ बांधण्याचे काम सुरू केले. 2024 चे ते भाजपचे उमेदवार निश्चित होते. पण अचानक राजकीय संदर्भ बदलले. हसन मुश्रीफ हे भाजप प्रणित महायुतीचे विद्यमान मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जागा वाटपात हा मतदारसंघ मुश्रीफ यांच्याकडेच राहणार आहे. परिणामी भाजपला तिथे आपला उमेदवार देता येणार नाही. जर कदाचित मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काही मतदारसंघापुरता आला तर कागल मध्ये मुस्लिम विरुद्ध घाटगे अशी महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. पण असे होईलच असे नाही.

संबंधित सिंह घाटगे हे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भारतीय जनता पक्षाने इथला हक्क सोडला तर कोणता झेंडा हाती घ्यायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न असेल. त्यांचे पिताश्री विक्रमसिंह घाटगे यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची किंवा मग तुतारी हातात घ्यायची हे दोन पर्याय समरजीत सिंह यांच्यासमोर आहेत.

लोकसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदार संघाने महाविकास आघाडीला साथ दिली होती. त्यामुळे मविआ चा उमेदवार येथे निवडून येऊ शकतो असे राजकीय गणित शरद पवार यांनी मांडले आहे. याशिवाय त्यांना मुश्रीफ यांचा राजकीय हिशोबही चुकता करावयाचा आहे.आणि मुश्रीफ यांना टक्कर देणारा तरुण,सक्षम उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्याशिवाय अन्य दुसरा कोणी नाही.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (08-08-2024): daily horoscope

नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं

दुसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लव्ह ट्रँगल!