प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ(Mahakumbh) सुरू आहे. दरम्यान महाकुंभमध्ये काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरी झाली होती. महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत.
दरम्यान मृताचां आकडा लपवला जात असल्याचा आरोप होत असताना आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्च यांनी खळबळजनक दावा केला आहे. चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे. यावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
प्रयागराजमधील महाकुंभ(Mahakumbh) चेंगराचेंगरी प्रकरणावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला, त्या म्हणाल्या की, “नदीत मृतदेह फेकून देण्यात आले, त्यामुळे नंदीचं पाणी अधिकच दूषित झालं आहे” राज्यसभेत शून्य प्रहरात जलशक्तीवरील चर्चेवर संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जया बच्चन यांनी हे उत्तर दिलं आहे.
“सध्या सर्वात जास्त दूषित पाणी कुठे आहे? ते कुंभमेळ्यात आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत ज्यामुळे पाणी दूषित झाले आहे. खऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही,” महाकुंभाला भेट देणाऱ्या सामान्य किंवा गरीब लोकांना पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही, तर व्हीआयपींना विशेष वागणूक मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
खासदार जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये सोनू निगम म्हणाले, “जया बच्चन यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभजी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा.”
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
महाकुंभात होणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता मेळाव्याच्या अधिकाऱ्याने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. आखाड्यांनी स्नान करावे अशी आमची इच्छा आहे, पदाधिकारी त्यांची व्यवस्था करत आहेत. आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला सबलीकरणावर आधारित चित्रपटाचं पोस्टर लाँच
‘मला तुझी पँटी…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा