तंदुरुस्त राहा, आनंदी राहा

शारीरिक आरोग्यासाठी मी जितकं होऊ शकते, तितकं योगा करते. वॉकिंग करते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नृत्य करते. नृत्य माझा छंद आहे. त्यातून मला खूप आनंद (happiness)मिळतो.
शारीरिक आरोग्यासाठी मी जितकं होऊ शकते, तितकं योगा करते. वॉकिंग करते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नृत्य करते. नृत्य माझा छंद आहे. त्यातून मला खूप आनंद (happiness)मिळतो. त्यातून फक्त शारीरिक व्यायामच नव्हे, तर मानसिक व्यायामही होतो. त्याशिवाय मी माझ्या पेटला फिरवते, त्याच्यासोबत खेळते.
त्यामुळे फक्त माझे आरोग्य नाही तर त्याच्याही आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यात मला आनंद मिळतो, ताणतणाव निघून जातो. त्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य छान राहते. मानसिक आरोग्यासाठी मी मेडिटेशनही करते, शिवाय देवाची आराधनाही करते. त्यातून मन प्रसन्न होते.

मी जिममध्ये कमी जाते. कारण मी जिममध्ये इक्विपमेंट्सचा वापर करण्यापेक्षा माझा कल नैसर्गिक व्यायामाकडे आहे. मी योगाद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. मी जिममधील ट्रेडमिल टाळण्याचा प्रयत्न करते. त्याऐवजी बाहेरच्या वातावरणात चालल्याने शुद्ध हवाही मिळते आणि व्यायामही होतो. मात्र, जिममध्ये मी सायकलिंग आवर्जून करते. त्याशिवाय नैसर्गिक गोष्टींपासून जो व्यायाम मिळू शकतो, ते करते. मी एकोणतिसाव्या मजल्यावर राहते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पायऱ्यांवर चढ-उतार करण्याचा प्रयत्न करते.

योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हा माझ्यासाठी जवळचा विषय आहे. त्यातून मनाला चांगली ऊर्जा मिळते आणि प्रसन्न वाटते. त्याच्या व्यतिरिक्त बरेच फायदे आहेत. आजच्या पिढीचे हार्मोनल असंतुलन होत असते, ते योगासने आणि प्राणायामामुळे खूप नियंत्रणात राहते. योगासने, प्राणायामामुळे शरीरातील विषारी घटक शरीरातून बाहेर काढून टाकायला मदत होते.
माझा आहार खूप शिस्तबद्ध असतो. मी सकाळी अकरा ते बारा या वेळेत जेवते आणि संध्याकाळी सहा ते सातच्यामध्ये जेवते. माझ्या आहारात दोन पोळ्या, भाजी, सॅलेड व जमल्यास ताकाचा समावेश असतो. भात मी जास्त खात नाही. प्रोटिन्सवर जास्त भर असतो. नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे अन् भाज्या मी आहारात जास्त घ्यायचा प्रयत्न करते. कामानिमित्त अनेकदा बाहेर असते. तरीही मी आहाराच्या वेळा पाळते. घरी बनविलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. जंक फूड टाळते.

हेही वाचा :

मन धोनीनं सामना जिंकला केएलनं!

अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार कोणं? शिंदे गटाचं काय ठरलंय?

हिटलर अभी जिंदा है!