मुंबई रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक(sunday) घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलसेवा उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी पश्चिम रेल्वे(sunday) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरूस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत काही लोकलसेवा उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत बोरिवली-गोरेगावदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच काही लोकलसेवा रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून चालविण्यात येईल.

हेही वाचा :

गॅरंटी हा केवळ तीन अक्षरांचा खेळ नव्हे, नरेंद्र मोदी यांचे वर्ध्यात प्रत्युत्तर

बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनामध्ये काशीबाईंचे योगदान

अधिकार, हक्क, मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून