व्हिडिओ गेम्सचा विळखा

व्हिडिओ/ कॉम्प्युटर (video)गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला.


तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतीदायक(video) गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद, कधी विलक्षण हताश. त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितकं लांब पळता येईल तेवढं पळायचं होतं.
व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला. अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडालेला. शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारा; पण आता आई-वडिलांनी कितीही समजावलं, रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू न शकणारा. गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेला. जे विश्व त्याला खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. त्याला एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे; पण त्यातली नशा त्याला पुनःपुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते.
आज व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अनेक मुलं अडकली आहेत, अडकत आहेत. मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर- पर्यायानं त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम घडवू शकणारं हे व्यसन आहे. या मुलांच्याबाबतीत आतून म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलूनच त्यांना यातून सोडवता येईल.
साधारणपणे टीनएजर्स असताना व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनाची सुरुवात झालेली आढळते. साधारण अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडतं. बरीच मुलं शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारी असतात; पण कितीही समजावलं, रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत.

त्यामुळे अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीय, मन:शांती हरवलीय, एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याचं गणित बिघडून गेलंय. मेरीटमध्ये येण्याची शक्यता असलेला मुलगा नापास होतोय. आई-वडील अस्वस्थ झालेत.
हीच गोष्ट अनेकांची झालीय. यातली बरीच मुलं शाळेला, कॉलेजला, क्लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडे लक्ष नाही.

घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इंटरनेट काढून टाकलं, तर मोबाईल, नाहीतर सायबर कॅफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काहीजणांना पटकन् व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय.

हेही वाचा :

उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!

मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका; मत विभाजनानं कोणाचा होणार ‘गेम’?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? ‘कचा-कचा’ वक्तव्य भोवणार