शेअर बाजाराला मतदानानिमित्त सुट्टी

सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील मतदानानिमित्त(holiday) सोमवारी, २० मे रोजी दोन्ही प्रमुख शेअर बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही शेअर बाजारांनी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

त्या दिवशी शेअर, डेरिव्हेटिव्ह(holiday), सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग श्रेणीमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, ईद-उल-फित्र (ईद) आणि राम नवमीच्या निमित्ताने अनुक्रमे ११ एप्रिल आणि १७ एप्रिल रोजी, तर महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी शेअर बाजार बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, सात मे, १३ मे आणि २० मे रोजी पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि पालघर या लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा :

… अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली

पक्षापेक्षा नेते झाले मोठे!

हार्दिकला हेच हवं होतं की…; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?