भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, वातावरण तापलं

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना गोवंडीमध्ये(atmosphere) घडली आहे. भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार ऱॅलीत सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा रॅलीवर दगडफेक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे.

देवनार गौतमनगर परिसरात रॅली(atmosphere) दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जोरात तयारी सुरू आहे. उमेदवार आपापला प्रचार करत आहेत. यादरम्यान बऱ्याचदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक वार होताना आपल्याला दिसतात. पण अशातच आता दगडफेक झाल्याची देखील घटना घडली आहे.

मानखुर्द गोवंडी विभागातमध्ये ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान हा भयानक प्रकार समोर आला आहे. मानखुर्द गोवंडी विभागातील गौतम नगर परिसरात प्रचार रॅली आली होती. त्यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली. मिहिर कोटेचा यांनी ही दगडफेड विरोधकांनी केल्याचा आरोप केला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मुंबईत सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहचलेला आहे. अशातच मिहिर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली दिसत आहे.

हेही वाचा :

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत 

हार्दिक पांड्याला मिळणार का संघात जागा अन्‌ दुसरा यष्टिरक्षक कोण?

महाराष्ट्र हा भटक्या आत्म्याची शिकार! मोदींचे अंधश्रद्धाळू वक्तव्य