मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत ट्रेनवर(train) दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. रेल्वे अधिकारी, आणि स्थानिक पोलिसांकडू या हल्लयाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर(train) दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रामध्येही अशी दगडफेक करण्यात आल्याने खरोखरच या बाबतीतही महाराष्ट्राचा युपी, बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय.
अचानकपणे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोणीतरी हुल्लडबाजी करत, कोणी गर्दुल्ल्याने दगडफेक केली का? की अन्य कोणते कारण आहे याचा शोध आता रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटची नवी वंदे भारत सुरु करण्यात आली. 16 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये मुंबई सेंट्रल-गांधीनगर, मुंबई सीएसएमटी-मडगाव, इंदूर-नागपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई- साईनगर शिर्डी, अहमदाबाद-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. पण सोलापूरमध्ये वंदे भारतवर झालेल्या दगडफेकीमुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, यापूर्वीही वंदे भारत ट्रेनवर हल्ल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या, गेल्या महिन्यात 1 डिसेंबरलाच दिल्लीला नजीकच्या गाझियाबादच्या मोदीनगर भागात डेहराडूनहून आनंद विहारला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन दगडफेक करण्यात आली असता रेल्वेच्या दोन डब्यांच्या काचा फुटल्या.
या भागात या ट्रेनवर अनेकदा दगडफेक झाली आहे. याबाबत रेल्वेने अहवाल दाखल केला आहे. या हल्ल्यात रेल्वेच्या दोन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या दगडफेकीमुळे ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी घाबरले होते. या भागातून सुटणाऱ्या या ट्रेनला काही लोक सातत्याने लक्ष्य करत दगडफेक करत आहेत.
22 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबरला मोदीनगरच्या या भागातून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर सिकरी कलान आणि सोना एन्क्लेव्ह कॉलनीजवळ दगडफेक झाली, तर हनुमानपुरी आणि श्रीनगर कॉलनीजवळ दगडफेक झाली.
हेही वाचा :
प्रस्थापित व्यवस्थेच…, राजकीय एन्काऊंटर!
आज छगन भुजबळ-शरद पवार एकत्र येणार; यामागचं कारण काय?
कोल्हापूर : सिंघम स्टाईल रीलसाठी शाळा वापरली! मुख्याध्यापकांचा धक्कादायक खुलासा