‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’

मुंबई इंडियन्सच्या संघाचा इंडियन प्रिमिअर लीगमधील पुढील सामना रविवारी(captain) होणार आहे. वानखेडेच्या मैदानावर 7 एप्रिल रोजी दिल्लीच्या संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला विजय मिळवून पराजयाची मालिका खंडित करावी लागणार आहे. मुंबईच्या संघाने आपले पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. हैदराबाद, गुजरात आणि राजस्थानच्या संघाविरुद्धचे सामने मुंबईने कमावले आहेत.

मुंबईचा सलग 3 सामन्यांमध्ये पराभव झाल्याने नव्यानेच कर्णधारपद(captain) स्वीकारलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. अशातच राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईने गामवल्यानंतर एका माजी क्रिकेटपटूने थेट मुंबईचं कर्णधारपद या आठवड्याभराच्या ब्रेकदम्यान पुन्हा रोहित शर्माकडे सोपवलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली आहे. या क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सच्या संघाची मालकी असलेलं अंबानी कुटुंब असा निर्णय घेताना मागे-पुढे पाहणार नाही असेही संकेत दिले आहेत.

राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईने गमावल्यानंतर ‘क्रिक बझ’वरील चर्चेमध्ये भारताचा सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी सहभागी झाले होते. मुंबईला राजस्थानने 6 विकेट्स आणि 27 बॉल राखून पराभूत केलं. या पराभवानंतर मनोज तिवारीने अचानक अंबानी कर्णधार बदलून पुन्हा नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे. आपण ज्या पद्धतीने या फ्रेंचायझीला ओळखतो किंवा जितकं त्यांच्या मालकांना ओळखतो त्याप्रमाणे ते असा एखादा निर्णय घेताना फार मागे-पुढे पाहणार नाहीत, असंही मनोज तिवारी म्हणाला.

कर्णधारपदाबद्दल बोलताना मनोज तिवारीने, “(राजस्थान आणि दिल्लीबरोबरच्या सामन्यादरम्यान असलेल्या) ब्रेकमध्ये कर्णधारपद पुन्हा रोहितकडे दिलं जाईल असंही होऊ शकतं. हा फार मोठा कॉल आहे. मी जितकं या फ्रेंचायझीला, मालकांना ओळखतो ते असा निर्णय घेताना मागे पुढे पाहत नाहीत,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना, “खरं तर याची सुरुवात तुम्ही तेव्हा केली होती जेव्हा नेतृत्वात बदल केला होता. तुम्ही जेव्हा 5 वेळा जिंकलेल्या कर्णधाराला असं काढून टाकता हाच मोठा कॉल आहे. कर्णधार बदलला तेव्हाच या साऱ्याची सुरुवात झाली,” असं सूचक विधान मनोज तिवारीने केलं.

“पॉइण्ट्स टेबलमध्ये एकही गुण नाही. सध्या कर्णधाराकडून नेतृत्वही साधारणच सुरु आहे. फार छान पद्धतीने कर्णधारपद संभाळलं जातंय, नशीब साथ देत नाहीय असं चित्रही दिसत नाहीये. शेवटच्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने 272 धावा मारल्या. त्यावेळेस तुम्हाला गोलंदाज नीट वापरता आले नाहीत. त्या सामन्यात तुम्ही पाहिलं असेल तर शेवटची ओव्हर शॅम्स मुलानीने केली. सुरुवातीला त्याने (हार्दिकने स्वत:) गोलंदाजी केली. समोरचा संघ त्याच्या गोलंदाजीवर धावा करत होता तरी तो स्वत: गोलंदाजी करत राहिला. तुम्हाला मार पडत असेल तुमच्या संघातील बेस्ट बॉलर असलेल्या बुमराहला तुम्ही 13 व्या ओव्हरला आणलं,” असं मनोज तिवारी म्हणाला.

हेही वाचा :

संगीत सिरेमनीमध्ये तापसी पन्नूने मॅथियास बोसोबत केला रोमँटिक डान्स

सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी घेतला मोठा निर्णय

ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय