ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीमहासंघाचा माजी अध्यक्ष आणि भाजपचा उत्तर प्रदेशातील खासदार(family court) ब्रिजभूषण सिंह याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधातील ऑलिम्पिकविजेत्या कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची निश्चिती करण्याबाबत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं आपला निकाल १८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.

याप्रकरणी ऑलिम्पिकपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह इतर काही महिला कुस्तीपटूंनी(family court) ब्रिजभूषणवर लैंगिक शोषणांची आरोप निश्चिती व्हावी यासाठी दिल्लीच्या स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला आहे, तसेच १८ एप्रिल रोजी यावर निकाल देणार आहे.

याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला असून यापूर्वी राऊस अव्हेन्यू कोर्टानं काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवलं होतं.

ब्रिजभूषण शरण सिंहच्याविरोधात सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. यानंतर मात्र या मुलीनं आपला जबाब मागे घेतला होता. पण इतर कुस्तीपटूंच्या आरोपांवरुन ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कलम ३५४, कलम ३५४ अ आणि ड या अंतर्गत चार्जशीट दाखल केली होती.

हेही वाचा :

सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी घेतला मोठा निर्णय

कर्माने अन् नियतीने डावलले; खासदार मानेंनी शेट्टींना डिवचले

5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान