संगीत सिरेमनीमध्ये तापसी पन्नूने मॅथियास बोसोबत केला रोमँटिक डान्स

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड(romantic getaways) मॅथियास बोसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी लग्न केले असे म्हटले जात होते. पण त्याच्या लग्नाचे काहीच फोटो किंवा व्हिडीओ समोर आले नव्हते. तसंच या कपलने देखील अधिकृत घोषणा केली नव्हती.

अशामध्ये बुधवारी तापसी पन्नू आणि मॅथियासच्या लग्नाचा एक व्हिडीओ(romantic getaways) व्हायरल झाला. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये तापसी पन्नू पंजाबी स्टाइलमध्ये दिसली. तापसीचा लग्नाचा व्हिडीओ पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले. आता तापसीचा मॅथियाससोबतचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता तापसीचा संगीत सिरेमनीमधील रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तापसी आणि मॅथियास सालसा डान्स करताना दिसले. या कपलचा रोमँटिक डान्स खूपच जबरदस्त आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाल्याचे दिसत आहे. यावेळी तापसीने शिमरी कॉर्ड सेट कॅरी केला होता. तर मॅथियासने पिंक सूट कॅरी केला होता. या कपलच्या डान्सपूर्वी तापसीच्या बहिणींनी जबरदस्त डान्स केला.

असा दावा केला जात आहे की, तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी उदयपूरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी पन्नू पंजाबी स्टाइलमध्ये नवरीसारखी नटून थटून मॅथियास बोकडे येते. मॅथियासने देखील शिख पद्धतीने लूक केल्याचे दिसत आहे. पण व्हायरल होणारा व्हिडीओ खूपच अस्पष्ट आहे. स्टेजवर उभा राहिलेल्या मॅथियासने शेरवानी घातली असून डोक्यावर पगडी बांधली आहे. या लूकमध्ये मॅथियासला ओळखणं देखील कठीण झाले आहे. तापसी पन्नू लग्नामध्ये खूपच उत्साहित दिसत आहे. नाचत नाचत ती स्टेजच्या दिशेने येते आणि मॅथियासच्या गळ्यात वरमाला घालते..

लग्नामध्ये तापसीने अनारकली स्टाइलचा हेव्ही वर्कवाला पंजाबी सूट घातला होता आणि त्यासोबत तिच्या वेणीत परंडा, हातात चुडा आणि लांबलचक कलीरे घालते होते. पंजाबी स्टाइल वधूमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियासला वरमाला घालताना दिसत आहे. आधी तापसी मॅथियासला वरमाला घालते. त्यानंतर मॅथियास तापसीच्या गळ्यात वरमाला घालतो. तापसी भारतीय असली तरी मॅथियासने भारतीय संस्कृती ज्याप्रकारे स्वीकारली ते पाहून चाहते खूपच प्रभावित झाले. अद्याप तापसी पन्नूकडून लग्नाबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

हेही वाचा :

सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी घेतला मोठा निर्णय

कर्माने अन् नियतीने डावलले; खासदार मानेंनी शेट्टींना डिवचले

5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान