मुंबई : गँगस्टर अरूण गवळी हा सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 2006 च्या शिक्षामाफी धोरणातील सर्व अटींचे आपण पालन केले आहे, असा गवळीचा दावा आहे. अरुण गवळी याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या(Supreme Court) गवळीचा जामीन फेटाळण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

गुन्हेगारी विश्वातून राजकारणी बनलेला अरुण गवळी याला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) नकार दिला आहे. अरुण गवळी सध्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 2007 मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2006 च्या शिक्षामाफी धोरणातील सर्व अटींचे आपण पालन केले आहे, असा गवळीचा दावा आहे. अरुण गवळी याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या गवळीचा जामीन फेटाळण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ७ जानेवारी रोजी गवळी याला २८ दिवसांची रजा मंजूर केली होती. गवळीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात आपली सुटका व्हावी अशी विनंती केली. त्याचा शिक्षामाफीचा अर्ज उपमहानिरीक्षक (डीआयजी) तुरुंग, (पूर्व विभाग) नागपूर यांनी आधीच फेटाळला होता.
गँगस्टर म्हणून अरुण गवळी मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळ या भागातून प्रसिद्धी झोतात आला. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, अपहरण, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्याची ९० च्या दशकात त्याची मुंबईत मोठी दहशत होती. दाऊद टोळीचा प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. तो अखिल भारतीय सेना या राजकीय पक्षाचा संस्थापक आहे. तो २००४ ते २००९ पर्यंत या कालावधीत मुंबईतील चिंचपोकळी मतदारसंघाचा आमदार होता. खून प्रकरणी गवळीला २००६ मध्ये अटक करण्यात आली. जामसांडेकर यांच्या हत्येचा खटला चालवण्यात आला.
हेही वाचा :
“आज की रात” गाण्यावर विद्यार्थिनीबरोबर शिक्षकाचा अश्लील डान्स Video Viral
‘शरद पवारांनी मला 4-5 वेळा…’; करूणा शर्मांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा
राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार परीक्षा