घ्या हाती मशाल… देशाची वाट लावणाऱ्यांना, महाराष्ट्रातून रोजगार पळवणाऱ

फक्त निवडणुका आल्यामुळे मते मिळवण्यासाठी (Misguided)सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱया जाहिराती आणि भाजप-मिंध्यांच्या ‘फेकनाम्या’ची शिवसेनेने चांगलीच पोलखोल केली. मिंधे-भाजपच्या फसव्या प्रचाराला सडेतोड उत्तर देणाऱया धमाकेदार जाहिराती शिवसेनेने प्रसिद्ध केल्या आहेत. शिवसेनेच्या या जाहिरातींची समाज आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

‘वॉर रुकवा दी पापा…’ या जाहिरातीला ट्रोलर्सने चांगलेच फटकारल्यामुळे ही जाहिरात मागे घेण्याची नामुष्की भाजपवर ओढावली होती. याच जाहिरातीचा समाचार शिवसेनेने खास अंदाजात घेतला. शिवसेनेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या जाहिरातीत पिता आणि लेकीमधील संवाद दाखवला आहे.(Misguided हे लोक भ्रष्टाचार मिटवून देशात काळा पैसा परत आणणार होते आणि आज हेच लोक भ्रष्टाचाऱयांना आपल्यासोबत घेतायत… देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱयावर आता आत्महत्या करण्याची वेळ आलीय… महिलांवरील अत्याचार, महागाई आणि बेरोजगारी रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेय, असे वडील मुलीला म्हणताना दिसतात. यावर प्रत्येक वेळी ‘वॉर तो रुकवा दि ना पापा’ असे म्हणणाऱ्या मुलीला ‘यांनी देशाची वाट लावली पापा’ असे बोल बेटा, असे पिता म्हणतो. त्यावर मत तर तुम्हीच दिले ना पापा, असे बोलून लेक पित्याला चुकीची जाणीव करून देते. परिवर्तनासाठी आता शिवसेना पक्षाची मशाल हाती घ्या, असे आवाहन या जाहिरातीतून करण्यात आले आहे.

परदेशातून काळे धन परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी 2014 मध्ये दिले होते. आपल्या खात्यात 15 लाख जमा होतील, याच आशेवर असलेला एक शेतकरी रोज बँकेत जाऊन पासबूक अपडेट करतो. रोज-रोज बँकेत आल्याने तुमचे पैसे वाढणार नाहीत, असे बँक कर्मचारी त्यांना म्हणतो. यावर 15 लाख जमा झाले का हे पाहायला आल्याचे शेतकरी सांगतो. त्यामुळे बँकेत हशा पिकतो. या जाहिरातीतून ‘जुमलेबाजांना फेकून द्या’ असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक उद्योगधंदे भाजप सरकारने गुजरातला पळवले. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे रोजगार बुडाले. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेलेला तरुण रात्री बेंचवरच झोपतो. सकाळी सफाई कर्मचारी त्याला झोपेतून उठवतो तेव्हा ती पंपनीच गायब झाल्याचे तरुणाला दिसते. त्यावर ‘गुजर गयी रात, पंपनी गई गुजरात’ असे सफाई कर्मचारी म्हणताना दिसतो. ‘रोजगार पळवणाऱयांना द्या फेकून’ अशी साद या जाहिरातीतून घालण्यात आली आहे.

भाजपने ज्यांच्यावर कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आता त्यांच्या पक्षात सामील झाल्यावर स्वच्छ झाले आहेत. अनेकांना क्लीन चिट मिळाली. भाजपच्या या वॉशिंग मशीनमध्ये हजार कोटी ते सत्तर हजार कोटीपर्यंत सगळेच डाग स्वच्छ होतात, असा दोन गृहिणींमधला संवाद आहे. भ्रष्टाचाराची मशीन आता फेकून द्या, असे आवाहन जाहिरातीतून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संजयकाका पाटलांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्वकियांची भाजपकडून गच्छंती

सांगलीत जागा गमावली तरी काँग्रेसमध्ये आणखी एका नेत्याचा उदय

मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती